Home
About Us
Gallery
Photo Gallery
Video Gallery
Office Bearers
Committee Pages
Societies
Publications
Contact Us
VIDEO GALLERY
Mukta Public Awareness series
Mukta Public Awareness series opening video. S1 E1 .resharing it on this platform. जोखमीचे बाळंतपण म्हणजे काय?
मुक्ता विडिओ सिरीज S1 E 2 गरोदरपणातील बीप डॉ मीनल देशमुख ( अमरावती)
S1 E3 on multiple pregnancy by Dr Madhuri Mehendale ( consultant OBGY Mumbai) now on Mukta FB page ....जुळी बाळं व गरोदरपणातील समस्या
AMOGS High Risk Pregnancy Committee and Mukta public awareness video series proudly presents..S1E4 .Diabetes in pregnancy गरोदरपणातील डायबेटिस by Dr Varsha
S1E5 दिवाळी च्या मधेच 25 तारखेला ग्रहण येतय आणि आनंदावर विरजण पडल्या प्रमाणे सगळीकडे काळजीचे सावट आहे.....गरोदर असताना ग्रहण पाळायचे का ?? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेवू यात ....सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ शंतनु अभ्यंकर यांच्या कडून !!
S1E6 ऑक्टोबर महिना हा जगभर breast cancer awareness month म्हणवला जातो. आणि जगभर विविध स्तरांवर , स्तनांच्या problems बाबत जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. या महिन्या आखेरीस मुक्ता विडिओ सिरीज घेवून येत आहे.....नागपूर येथील नामांकित स्त्रीरोग तज्ञ डॉ. शांता भोळे यांचे अतिशय समर्पक lecture ...
S1E7 November हा ( premarity ) म्हणजे "अकाली प्रसुती" awareness महिना म्हणवला जातो. त्या निमित्ताने .......मुक्ता विडिओ सिरीज घेवून येत आहे स्पेशल विडिओ!वक्त्या : डॉ प्रतिमा कानडे ( स्त्री रोग तज्ज्ञ नाशिक)
S1E8 14 November हा जागतिक मधुमेह diabetes दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने गरोदर पणात sugar का आणि कशी तपासली पाहिजे हे आपल्याला समजावून सांगत आहेत. पुणे स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेचे प्रमुख डॉ पराग बिनिवाले .
S1E9 आज 26th November 2022 आजचा दिवस iron deficiency awareness day म्हणजेच लोहाची कामतरता व रक्ताची कमतरता याबाबत जागरुकता निर्माण करण्या करता नेमलेला दिवस! Amogs High risk pregnancy committee व Mukta Public Awareness series घेऊन येत आहे " लहू" !! या भागात अकलूज स्त्रीरोग तज्ज्ञ संघटन च्या संस्थापक आणि सीनियर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ वंदना गांधी मॅडम यांच्या कडून जाणून घेऊया याबद्दल महत्त्वाची माहिती. नक्की बघा व share करा.
S1E10 आज 1 December 2022, World AIDs day . "गरोदरपण व HIV infection" या संवेदनाशील पण अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, मुंबई चे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व AMOGS 2nd Vice President Dr. Ameya Purandare sir. HIV AIDS awareness साठी हा विडिओ नक्की बघा व share करा 😊.
S1 E11 Oligohydoamnios. बाळाच्या भोवतालचे पाणी कमी होणे. या common पण अतिशय महत्त्वाच्या problem विषयी शंका निरसन करण्यासाठी माहिती देत आहेत. नागपूर च्या स्त्री रोग तज्ज्ञ व Associate Professor Dr. Rajasi Kane Sengupta.
S1 E12 Season 1 चा शेवटचा भाग! Polyhydroamnios म्हणजेच बाळाच्या भोवतालचे पाणी जास्त असणे...याबाबत माहीती देत आहेत तळेगाव दाभाडे येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेणुका पारवे.
S2E1 सर्वांना 2023 वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! आणि mukta series च्या season 2 च्या पहिल्या भागात मनापासून स्वागत! Mukta series चा प्रमुख उद्देश हा की high risk pregnancy म्हणजे जोखमीचे बाळंतपणाबद्दल लोकांना अनेक प्रश्न गैरसमज असतात . त्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून शास्त्र शुद्ध माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे. आजचा विषय तर फार महत्त्वाचा. जोखमीची गर्भावस्था व डॉक्टरांचा रुग्ण व नातेवाईकासोबत चा सुसंवाद . आणि या वर मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत. Fogsi vice president elect , amogs second joint secretary Dr. Ajay Mane sir आणि त्यांनी अतिशय सोप्या शब्दात अतिशय मार्मिक संवाद साधला आहे . तर नक्की हा video बघा share Kara...and stay tuned for next episode of season 2 !
S 2 E2 मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत! जानेवारी महिना म्हणाल की संक्रात आठवते. हळदीकुंकाचा माहोल तयार होतो. आणि रोज सजून तयार व्हायला बायका सरसावतात... पण मैत्रिणीनो त्या व्यतिरिक्त January महिना हा Thyroid awareness month म्हणुन ओळखला जातो. Thyroid व गरोदरपणाबाबतच्या अनेक प्रश्नाची उत्तरे द्यायला आज आपल्या सोबत आहेत... पुणे येथील स्त्रीरोग तज्ञ व ivf specialist Dr. Sharayu Bhalerao . तर नक्की हा video बघा share करा. मकर संक्रांती च्या शुभेच्छा!
S2 E3 IVF Pregnancy Patient चे ivf pregnancy बाबत अनेक प्रश्न असतात . Ivf ची गर्भधारणा कृत्रिम असते का? Ivf Pregnancy मध्ये खूप काळजी व जास्त औषधे लागतात का ? पूर्ण bed rest लागते ?टाका घ्यावाच लागतो ? Delivery Caesarean ने का normal होऊ शकते? याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज आल्याबरोबर आहेत पुणे येथील नामांकित वंध्यत्व चिकित्सातज्ञ , Oasis ivf Pune चे प्रमुख, FOGSI Quiz Committee Chairsperon Dr.Nilesh Balkawade. नक्की बघा व share करा!
S2E4 "Pregnancy in scarred uterus" Cesarean section , hysterotomy, myomectomy इत्यादी procedure मुळे पिशवीवर घाव/ scar येतो. त्यामुळे काय संभाव्य धोके आहेत? पुढील pregnancy चा Gap किती असावा? आधीच्या टाक्यांमुळे पुढच्या pregnancy मध्ये काय risk आहे? टाके उसवू शकतात का ? नॉर्मल delivery शक्य कधी आहे ? त्यात काय risk आहे? यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत अकोला येथील डॉ सुजाता नालट गुजरकर . Video नक्की पहा share करा !
S2E5 आजचा topic आहे Antenatal care . म्हणजे प्रसुती पूर्व तपासणी. दिवस गेले की घरात आनंदी उत्साहचं वातावरण निर्माण होते. पण त्या बरोबर patinet च्या नातेवाईक च्या मनात थोडी काळजी आणि confusion पण असते अनेक प्रश्न असतात... Check ups कधी आणि किती अंतराने करायचे? रक्ताचे कधी आणि काय reports करायचे? सोनोग्राफी किती कधी आणि कुठल्या करायच्या? तर या सगळ्या common प्रश्नाचे उत्कृष्ट पणे शंका निरसन करण्यासाठी आपल्या बरोबर आज आहेत. Amogs public awareness committee च्या chairperon आणि सोलापूर येथील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ Dr. Monica Umbardand हा अतिशय उपयुक्त video आहे. नक्की बघा व share करा . Stay tuned for next episode!
S2E6 आज 13 February , World Epilepsy Day! Epilepsy म्हणजे अपस्मार/फिट / झटका येणे. कोणालाही फिट आली तर आजूबाजूचे सगळेच घाबरून जातात आणि फिट आलेली व्यक्ति जर दोन जिवाची आई असेल तर मग विचारायलाच नको! गरोदर पणातील अपस्मार/ फिट याबद्दल माहीती देण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत . उत्कृष्ट वक्ते .. Gestosis India चे secretary Dr Gorakh Mandrupkar. Sir चा गरोदरपणातील BP, झटका यावर सखोल अभ्यास आहे. त्याविषयी अनेक नियमावली व पुस्तके लिहिली आहेत. तर आजचा episode अगदी नक्की बघा share Kara. Stay tuned for next episode
S2E7 गरोदरपणातील आहार हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. याबाबतचे समज गैरसमज दूरकरण्यासाठी आपल्या बरोबर आहेत अहमदनगर स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या secretary Dr Sonali Vahadane . नक्की बघा share करा. Stay tuned for next episode!
S2E8 Exercise not only changes your body.. it changes your mind & Your attitude ! आणि आई तन मनाने निरोगी असेल तरच भावी पिढी निरोगी होईल! गरोदरपणात excercise करायला मुली घाबरतात की पोटाला , बाळाला.. काही problem येणार नाही ना ? पण त्याबरोबर pregnancy मध्ये physically active रहायला पाहिजे हेही काळत असते. आज यासाठी नाशिक येथील प्रसिद्ध सीनियर स्त्रीरोग Dr. Suchita Bachhav यांनी प्रात्यक्षिकाच्या रुपात pregnancy मधला व्यायाम, योगासने याची अतिशय उत्तम माहिती दिली आहे. विडिओ नक्की बघा व share करा ! Stay tuned for next episode!!
s2 E9 आज 4 March, World Obesity Day ! Obesity म्हणजे स्थुलता / जाडी. सध्या जगभर Obesity ची epidemic म्हणजे साथ जणू पसरलीय अस म्हंटले जातय इतकं स्थूलतेचा प्रमाण वाढत चाललाय. त्याच मुळे गरोदरपणातील पण अतीवजन हा आम्हा स्त्री रोग तज्ज्ञांसाठी common problem झाला आहे. कारण त्यामुळे गर्भवती माता व होणारे बाळ याना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. Obesity हा शारीरिकच आजार नसून त्याचे मानसिक पैलू पण आहेत. त्यामुळे आहार तज्ञ, obesity specialist आणि स्त्री रोग तज्ज्ञ यांनी एकत्र येऊन याची management करावी लागते. यांबद्दल विशेष मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत नाशिक येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ Dr Gauri Karandikar . Video नक्की बघा share Kara.
S2E10 "Women's Day Special Episode" Amogs या राज्यस्तरीय स्त्री रोग तज्ज्ञ संघटन तर्फे president Dr Rajendrasing pardeshi sir , Secretary Dr sujata Dalvi madam आणि Amogs high risk pregnancy committee प्रमुख Dr Rashmi kahar madam व Amogs च्या सर्व स्त्रीरोग तज्ज्ञां कडून तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त च्या हार्दिक शुभेच्छा! *DigtAll & embrace the equity* या विषयावर आज आपल्याशी बोलणार आहेत खुद्द AMOGS चे president Dr .Rajendrasing Pardeshi, sir . हा Episode नक्की बघा जास्तीत जास्त share करा. Stay tuned for the next episode.
S2 E11 Age is just a number असं म्हटलं जात. पण स्त्रिया आपले biological age व त्यामुळे होणारे बदल थांबवू शकत नाही. 35 किवा जास्त वयात मूल होणार असल्यास त्याला Elderly pregnancy म्हणतात. जास्त वयात मुळे आई ला होणार्या बाळाला काही problems येवू शकतात. त्यासाठी काय काळजी घ्यावी व त्यावर उपाय काय हे सांगण्यासाठी आपल्याबरोबर आहेत अमरावती येथील नामांकित स्त्रीरोग तज्ञ Dr Shalaka Bari . EPISODE नक्की बघा शेअर करा. Stay tuned for next episode!
S2E12 आज 21 मार्च जागतिक Downs Syndrome दिवस. आपल्या शरीरात 46 गुण सूत्रांचे 23 जोड असतात. यात 21 नंबर च्या गुणसूत्रात 1 extra गुणसूत्र गेले तर त्याला Trisomy 21 अथवा Down's Syndrome असं म्हटलं जातं . याप्रमाणे 13, 18 व तर इतर कुठल्याही गुणसूत्रामध्ये हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. अशी बाळे मतिमंद निघू शकतात आणि त्यांचात अनेक शारीरिक व्याधी पण असू शकतात. त्यामुळे जन्माला येणारे बाळ आनुवंशिक दृष्टिकोनातून निरोगी आहे की नाही याचा पडताळा करून घेणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी काय विशिष्ट सोनोग्राफी, रक्ताचे report करावे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत. चंद्रपूर येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ ऋजुता मुंदडा. Episode नक्की बघा व share करा.
S2E13 घरात बाळाची चाहूल लागली की सारं घर आनंदून जातं, पण जर होणार्या आई ला अचानक जर bleeding किवा रक्तस्त्राव झाला तर सगळ्या घरावर काळजीचं सावट येत. पाहिल्या 3 महिन्यात bleeding झाले तर काय कारणं असतात आणि त्यावर काय उपचार असतात हे समजून सांगण्यासाठी आपल्या बरोबर आहेत यवतमाळ येथील Dr Amruta punaseTupakar . खूप सोप्या शब्दात अतिशय छान पद्धतीने या video चे सादरीकरण केलेले आहे. तर विडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त share करा.
S2E14 आज 11 April 2023 National Safe Motherhood Day च्या सर्व मातांना व त्यांची काळजी घेणार्या स्त्रीरोगतज्ज्ञांना हार्दिक शुभेच्छा ! Pregnancy मध्ये 28 आठवड्यापासून ते बाळाच्या जन्मापर्यंत, bleeding झाले तर त्याला APH असे म्हणतात. जगभरात 3 ते 5% महिलांना याचा धोका संभवतो पण भारतात याचे प्रमाण जवळ जवळ 18% आहे. त्याची कारणे अनेक असतात.. पण अचानक वार सुटणे ( Abruptio placenta) हे त्यातल एक महत्वाचं आणि काळजीचं कारण. याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत ठाणे येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ Dr Dipali Kapote. Video नक्की बघा व share करा.
S2 E15 आज आपण बघणार आहोत गरोदरपणातील अकाली रक्तस्त्राव भाग 3 विषय आहे Placenta previa . Placenta म्हणजे वार ..previa ( Latin शब्द) म्हणजे आधी येणे. Normally वार पिशवीच्या वरच्या भागात असल्याने बाळाच्या जन्मानंतर बाहेर पडते. जेव्हा ही वार बाळाच्या पुढे पिशवीच्या तोंडाशी असेल तेव्हा त्यातून अचानक रक्तस्त्राव होऊन तो मातेला प्राण घातकही ठरू शकतो. सध्या याचे प्रमाण वाढले आहे आणि आधीच्या सिझेरियन deliveries मुळे तर याची गुंतागुंत अजूनच वाढतिये. नाशिक येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ Dr Chetana Dahivelkar आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी हा क्लिष्ट विषय अगदी सहज सोप्या पद्धतीने समजावला आहे. विडिओ नक्की बघा व share करा. Stay tuned for next episode!
S2E16 भारतामधे जवळ जवळ 121 दशलक्ष गर्भ धारणा अनपेक्षित असतात. म्हणजे 7 पैकी 1 pregnancy ही unplanned किंवा unwanted असते. आणि मग गर्भपाताचा प्रश्न उभा राहतो. बाळातील व्यंग हेही एक महत्त्वाचे कारण. गर्भपात म्हंटल की काहीशी भीती, शंका लाज आणि अनभिज्ञता यामुळे अजूनही भारतात 67% गर्भपात हे बेकायदेशीर पद्धतीने होतात. 2022 च्या statistics प्रमाणे दररोज 8 स्त्रिया या unsafe गर्भपातामूळे मृत्युमुखी पडतात. आज या संवेदनाशील topic वर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत खुद्द AMOGS संघटनेचे Vice president Dr Kiran Kurtkoti sir. Video अतिशय माहितीपूर्ण व to the point aahe . गर्भपाताविषयी सर्व शंकांचे निरसन करायला हा video नक्की बघा व share करा. Stay tuned for next episode
S2 E17 मे महिना हा Teenage Pregnancy awareness month आहे. जगभरातील जनगणनेनुसार भारत मध्ये किशोरवयीन लोकसंख्या सर्वात जास्त आहे. 253 दशलक्ष मुले ही 10 ते 19 वयोगटांतील आहेत. हे वय म्हंटल तर जडणघडणीचा नाहीतर विध्वंसक पण. आज याविषयी आपल्याबरोबर अगदी मनमोकळा संवाद साधलाय , मुंबई च्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ Dr Supriya Arwari madam यांनी ! हा विडिओ नक्की बघा, किशोरवयीन मुलांना पण दाखवा. Stay tuned for the next episode !
S2 E18 मे महिना teenage pregnancy awareness months आहे .20 वर्षांच्या आत Pregnancy / Teenage pregnancy ही जागतिक समस्या आहे. 1000 स्त्रियांमागे teenage pregnancy चे प्रमाण भारतात 62 इतके आहे .शिक्षणाचा अभाव, आर्थिक कमकुवता, लवकर लग्न आणि कुटुंब नियोजनाबद्दल अनभिज्ञता ही त्याची ठळक कारणे. Recent NHM survey प्रमाणे भारतात 11.8 दशलक्ष मुली या कोवळ्या वयातच मातृत्वाच्या ओझ्याने दबल्या गेल्यात. किशोरवयीन गर्भ अवस्था का घातक आहे त्याचे आई व बाळावर काय परिणाम होतात हे explain करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत Hinganghat येथून Dr Jaya Tulaskar . Episode नक्की बघा व share करा.
S2E19 Season 2 च्या शेवटाच्या भागात सर्वांचे मनापासून स्वागत! आजचा विषय आहे लग्नापूर्वीचे समुपदेशन ! लग्न ठरवताना शिक्षण, घरदार, नातेवाईक, रंग रूप, जातपात, पत्रिका या सर्व दृष्टीनी पारखून घेताना शारीरिक त्रुटी, आजार याचा विचार आपण करतो का? HIV Hep B , thalassemia Trait सारखे report पण बघतो का? भावी पिढी सुदृढ व्हावी यासाठी हा विचार जास्त महत्त्वाचा नाही का? अशा पूर्वापार चालत आलेल्या आपल्या प्रथांबाबत चा दृष्टिकोन बदलण्यासाठी डोळ्यात अंजन घालणारा आजचा video आहे वक्ते आहेत Tembhurni येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ व Amogs asthetic & sexual medicine committee चे प्रमुख Dr Madan Kamble sir . मुक्ता series ला आजवर तुम्ही सगळ्यानी भरभरून प्रतिसाद दिलात त्यासाठी मनापासून धन्यावाद , तुमचं प्रेम असाच कायम राहू द्यात. भेटूयात season 3 मध्ये. नवे विषय घेऊन नव्या तज्ञांसोबत
S3E1 आजारापेक्षा प्रतिबंध बरा आणि infection पेक्षा vaccine ! आजचा विषय आहे *गरोदर पणातील लसीकरण* आजच्या व्याख्यात्या आहेत पुणे येथील अनुभवी व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व Fogsi vice president elect 2024 Dr Girija Wagh madam. प्रत्येक गर्भवती माता व जन्माला येणार्या बाळाचा लसीकरण हा प्रार्थमिक अधिकार आहे. चला तर मग कुठलीही शंका न बाळगता न बाळगता लसीकरण करुयात आणि भावी पिढी रोगमुक्त बनवूयात!
S3 E2 Fever in pregnancy गरोदरपणातील ताप ताप येणे हे एक लक्षण आहे ज्याची कारणे अनेक असू शकतात. आणि pregnancy मध्ये फक्त आई नाही तर पोटातल्या बाळाला पण त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागत. याबद्दल आज आपल्याला माहिती देणार आहेत औरंगाबाद येथील स्त्री रोग तज्ज्ञ , Amogs Youth coordinator 2022-24, joint secretary Aurangabad Society. DR Sunita Khedkar
S3 E4 UTI in pregnancy गरोदरपणात रक्ता बरोबर लघवी तपासली जाते कारण pregnancy मध्ये urine infection व्हायची शक्यता वाढते. तसेच ते बर्याचदा asymptomatic म्हणजे लक्षण विरहित पण असू शकते. हे का होते, कसे टाळावे, त्याची Complications काय होऊ शकतात.. यावर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत. IMA भिवंडी President , Thane OBGY Society joint secretary Dr Ujwala Badrapurkar Madam.
S3E5 Delivery नंतरचा काळ वर करणी बिघायला गेला तर स्त्री च्या आयुष्यातील अगदी आनंददायी काळ... पण यादरम्यान ती बर्याच शारीरिक व मानसिक बदलांना सामोरी जाते. नव्या जबाबदारीने बिचकून जाते. सर्वांच्या अती सुचना तिला भंडावून सोडतात आणि यामुळेच 10 पैकी 1 स्त्री postpartum depression ला सामोरी जाते. या महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत नाशिक येथील प्रसिद्ध सीनियर स्त्रीरोग व वंध्यत्व चिकित्सातज्ञ , fogsi international academic exchange comittee incharge for last 4 yrs Dr Varsha Baste
S3E6 सिझेरियन delivery समज गैरसमज . सिझेरियन चे प्रमाण निश्चित वाढतय आणि त्याच बरोबर त्या बद्दल गैरसमजही. या ज्वलंत प्रश्नावर बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत यवतमाळ येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, Adolescent Health Committee, past Fogsi chairperson , present Amogs chairpersons , आणि Amogs चे प्रसिद्ध गायक Dr Girish Mane, Sir
S3E7 आजचा विषय आहे IUGR म्हणजे पोटातील बाळ वजनाने लहान असणे. यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत पुणे येथील नामांकित सीनियर स्त्रीरोग तज्ज्ञ, ivf specifically, निष्णात laproscopy तज्ज्ञ , past POGS President , Past Fogsi Vice president Dr Sunita Tandulwadkar madam.
S3E8 आज 11 July 2023 World population Day जागतिक लोकसंख्या दिन . 1990 साला पासून हा दिवस अमलात आणला गेला. त्याचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या . आज जगाची लोकसंख्या 8 अब्जाहून अधिक आहे आणि भारताची 1.4 अब्ज.. म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणुन, कुटुंब नियोजनाची साधने वापरणे, त्याची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. आज आपल्याबरोबर आहेत पुणॆ येथील प्रसिद्ध स्त्रीरोग व वंध्यत्व चिकित्सातज्ञ व laproscopy surgeon , Fogsi family welfare commitee chairperson Dr Ashish Kale
S3 E9 द्राक्ष गर्भ Dr Mandakini Megh
S3E10 Ectopic pregnancy ( पिशवी बाहेर राहिलेला गर्भ) Dr Vaidehi Marathe (Senior Gynac from Nagpur , past president NOGS and past AMOGS public awareness committee chairperson) AMOGS High Risk Pregnancy Committee Dr Rashmi Kahar Dr Revati Rane
S3E11 28th July World Hepatitis Day Hepatitis म्हणजे यकृताला सूज येणे. यकृत म्हणजे liver , शरीराचा अतिशय महत्वाचा अवयव , शरीराची metabolism म्हणजे चयापचयाची factory ! आजही जगभरात दशलक्षाहून अधिक लोकं Hepatitis मुळे मृत्युमुखी पडतात. Jaundice / काविळ हे त्याचे लक्षण. गरोदरपणातील काविळ ही तर अतिशय गंभीर बाब आहे. या विषयावर सखोल माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत मुंबई येथील प्रसिद्ध सीनियर स्त्रीरोग तज्ज्ञ Dr Komal Chavan ma'am Ma'am .
S3E12 जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जाणून घ्या माहिती सोलापूर येथील प्रसिद्ध स्त्रीरोग व वंध्यत्व चिकित्सातज्ञ Dr pratibha Baldawa यांच्या कडून. Amogs High risk pregnancy committee
S3 E13 गरोदरपणातील उलटी मळमळ Dr Varsha Lahade नाशिक येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, माजी अध्यक्ष नाशिक स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना, Amogs medicolegal committee chairperson.
S3 E14 PGD preimplantation genetic diagnosis ज्या जोडप्यांना आनुवंशिक दोष आहेत , अनेकदा गर्भपात होत आहेत, अनेकदा ivf फेल होत आहेत यांच्यासाठी हे शास्त्राचे वरदान आहे . ही अगदी advanced व प्रगत technology असून त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत पुणे येथील प्रसिद्ध स्त्रीरोग व वंध्यत्व चिकित्सातज्ञ Dr Ashwini Kale.
S3 E15 (Rh negative pregnancy) निगेटिव्ह रक्तगट व बाळंतपण भारतामधे साधारण फक्त 10% लोकांमधे negative रक्तगट आढळतो .O positive सर्वात common रक्तगट आहे आणि AB negative सर्वात uncommon . नवरा बायकोचा रक्तगट एक असला तर problems येतात हा निश्चितच एक गैरसमज आहे पण गरोदरपणात negative रक्तगट बाबत निश्चितच काही बाबी समजून घेणे व त्या follow करणे गरजेचे आहे . या विषयावर आज आपण एक अतिशय सुंदर video बघणार आहोत. सादरकर्ते आहेत नागपूर येथील young dynamic आणि talelnted स्त्रीरोग तज्ज्ञ Dr Apurva Mukharji
© 2020 amogsobgy.com |
Visitor's Counter